आयुर्वेदिक गर्भसंस्कार

प्रसूतीनंतर बाळाची व आईची तब्येत चांगली असेल तर माहेरी जाण्यास हरकत नाही. जर माहेर शहरात असेल व प्रसूतीसाठी तिकडे जायचे असेल, तर माहेरी गेल्यानंतर प्रथमतः जिथे प्रसूती करायची त्या डॉक्टरांना भेटून आपली फाईल, कागदपत्रे, सोनोग्राफीचे रिपोर्टस, रक्त, लघवी तपासणीचे रिपोर्टस दाखवून घ्यावेत. अचानक प्रसूतीच्या वेळेस जाणे धोक्याचे होऊ शकते. प्रसूतीच्या वेळेला गर्भवतीच्या आईने व पतीने जवळ असणे फार महत्त्वाचे असते, कारण पती व आईकडून तिला मानसिक आधार मिळतो. 4) पाश्चात्य देशांमध्ये प्रसूतीसमयी पतीलाही बोलावून घेतात; त्यामुळे मनोबल वाढते. 5) प्रसूतीला जाण्याआधी आपली व बाळाची अशा दोन बॅगा भरून ठेवाव्या. आपल्या बॅगेत पॅडस्, टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण, मॉइश्चराईजर क्रीम, पावडर, कंगवा, टिकल्यांचे पाकीट त्याचबरोबर 2 निकर, परकर, 2 फिडींग गाऊनस् ज्यामुळे बाळाला स्तनपान करण्यास सोपे जाईल अशा वस्तू ठेवाव्या. बाळाच्या बॅगेत वाटी, चमचा, अंगातील झबली, दुपटी, लंगोट, टोपी हे कपडे घ्यावेत. थंडीचे दिवस असतील, तर बाळ व आईसाठी स्वेटर घ्यावे. शक्यतो जुन्या सुती, स्वच्छ धुतलेल्या दोन साड्या असाव्यात, म्हणजे ऐनवेळी बाळ व बाळंतीणीला कपडे कमी पडल्यास त्या वापरता येतात. बाळाचे कपडे शक्यतो कॉटनचे व आधी धुतलेले असावे. बाळाच्या दुपट्यांना टिपा मारून घ्याव्यात, म्हणजे त्याचे धागे बाळाच्या अंगामध्ये गुंतून इजा होणार नाही. 6) प्रसूतिगृह घराच्या जवळ असावे तसेच तेथील डॉक्टर; त्यांच्याकडे येणारे व्हिजीटींग डॉक्टर, भूल तज्ञ यांची नीट चौकशी करून घ्यावी. प्रसूतिगृहात नाव नोंदणी झाल्यावर जिथे प्रसूती होणार आहे. ती डिलिव्हरी रूम पहावी म्हणजे तेथील वातावरण माहितीचे, ओळखीचे झाल्यामुळे ऐनवेळी गर्भवतीला भीती वाटणार नाही. प्रसूती होताना सिझेरीयनची वेळ येऊ शकते; म्हणून शस्त्रक्रिया कक्ष बघून घ्यावे. म्हणजे एकदम प्रसूतीच्या वेळेस तिथे गेल्यानंतर तिथे भीती वाटणार नाही. अचानक जर आपण या वातावरणात गेलो, तर घाबरल्यामुळे मनावर त्याचा ताण येऊन रक्तदाब वाढू शकतो. 8) ऑपरेशन थिएटर पाहिल्यानंतर प्रसूतीनंतर बाळाला काही प्रॉब्लेम आलाच, तर तिथे पटकन बाळाला ईमर्जन्सी हाताळण्यासाठी वॉर्मर, फोटोथेरपी, ऑक्सिजन यांच्या सुविधा आहेत की नाही ते पाहावे. 9) प्रसूतिगृहात गेल्यावर येणार्‍या औषधांचा खर्च, सुलभ प्रसूतीचा, सिझेरियनचा खर्च किती येतो याचा अंदाज घ्यावा, म्हणजे त्या प्रमाणे पैसे तयार ठेवून बरोबर नेता येतात. डॉक्टरांनी दिलेली प्रसूतीची तारीख उलटल्यास घरी बसू नये. ताबडतोब दवाखान्यात दाखल व्हावे, नाही तर बाळ पोटात गुदमरण्याची शक्यता असते. (क्रमश:)

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा