संवाद मुख्याध्यापकांशी दोस्ती माहिती अधिकार कायद्याशी अभियानाची 26 नोव्हेंबरपासून सुरुवात

अहमदनगर- माहिती अधिकार कायदा नागरिकांना मिळालेला हक्क आहे. नागरिकांचा हक्क व आधकारा कर्मचारी यांचे अंमलबजावणीचे कर्तव्य याची सांगड बसावी म्हणून माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांच्या नेतृत्वाखाली संवाद मख्याधापकांशी दोस्ती माहिती अधिकार कायद्याशी हे अभियान 26 नोव्हेंबर रोजी संविधानदिनापासून सुरु करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

कायदा लागू होऊन पंधरा वर्ष पूर्ण झाली व सोळावे वर्ष सुरु झाले. या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक विद्यालयातील हजारो मुख्याधापकाना, कर्मचार्‍यांना यशदाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला अनेक मुख्याधापकांनी व कर्मचार्‍यांनी दांडी मारलेली असल्याचेही लक्षात आले आहे. प्रशिक्षणानंतर कायद्याची योग्य अमलबजावणीसाठी कार्यालय प्रमुख म्हणून मुख्याधापकांनी कार्यालयात काही बदल, काही सुधारणा करणे अपेक्षित होते. त्या बाबतचे सोशल ऑडीट होणे अपेक्षित असल्याने हे अभियान संस्थेने सुरु केले आहे. कार्यालय प्रमुखांनी योग्य अम लबजावणी न केल्यास त्याबाबत शासन परिपत्रक आल्याने अनेक मुख्याद्यापकांच्या थेट आयोगाकडे तक्रारी गेलेल्या आहेत, आयोगाने त्याबाबत गंभीर दखल घेतली असून शिक्षण विभागाला कारवाईच्या सूचना व आदेश दिलेले आहेत.

या अभियानांतर्गत सुरुवातीला अहमदनगर तालुका व शहर पातळीवरील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याधापकांशी विठ्ठल बुलबुले व त्यांची टीम संवाद करतील व असलेल्या अडचणीबाबत मार्गदर्शन, सूचना व गरज असेल तिथे प्रशिक्षण देतील, माहिती अधिकार कायद्यानुसार बदल केलेल्या व न करणार्‍यां मुख्याध्यापकाबाबत मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त नाशिक, शिक्षण संचालक, यशदा संचालक, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी मनापा, यांना संस्थेच्या वतीने अहवाल पाठवण्यात येईल त्याबाबत कौतुक व कारवाई बाबत संस्था आग्रही असणार आहे असेही सांगण्यात आले. मुख्याधापकांच्या सोबतचा संवाद कार्यक्रम विठ्ठल बुलबुले विनामुल्य करणार आहेत. असे ही। जाहीर करण्यात आले. या बाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, प्रशासन अधिकारी मनापा यांचे सहाय घेण्यात येणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा