आयुर्वेदीय बालसंस्कार नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी?

स्तनपान

बाळाच्या विकासासाठी शारीरिक, बौद्धिक वाढीसाठी मातेचेच दूध श्रेष्ठ असते; म्हणून मातेने दुसरे कुठलेही दूध न पाजता स्वत:चेच दूध बाळाला पाजावे.

जन्मानंतर बाळाची अंघोळ झाल्यावर पूर्व दिशेला तोंड करून प्रसन्न मनाने स्तनपान करावे. स्तनपान करण्याआधी स्तन कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन व नंतर सुती कापडाने पुसून घ्यावेत म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारचा जंतूसंसर्ग होणार नाही; तसेच कोमट पाण्यामुळे दुग्ध वाहिन्यातील दूध सुटायला मदत होते व बाळाला दूध ओढण्यास सोपे जाते.

प्रथमत: स्तनपानासाठी उजवा स्तन बाळाला द्यावा व त्यानंतर डाव्या स्तनाने स्तनपान करावे. जन्मानंतर प्रथम स्तनपान लवकर सुरू करावे की, त्यामुळे माता व बाळ यांच्यात जवळीकता निर्माण होऊन स्तन्यउत्पत्ती लवकर सुरू होते. मातेचे दूध पिणे हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तर बाळाला दूध पाजणे हे मातेचे निसर्गदत्त कर्तव्य आहे.

 डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

कालिका प्राईड, लाल टाकी रोड, अहमदनगर

मोबाईल नं- ८७९३४००४०० वेळ ९ ते १२

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा