हरित क्षेत्र विकास योजनेत शहरात 11 नवीन उद्यानांच्या कामांना मंजुरी

अहमदनगर – केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास योजनेतून मंजूर असलेल्या निधीतील कामांपैकी अडथळा असलेली 7 कामे वगळण्यात आली असून, त्याऐवजी नवीन 11 उद्यानांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

नगरविकास विभागाकडून याबाबत महापालिकेला आदेश देण्यात आले असून, सदरची कामे जुलैअखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हरितक्षेत्र विकास योजनेतून मनपाला सुमारे साडेचार कोटींचा निधी मिळालेला आहे. यातून शहरातील मोकळ्या जागांवर उद्याने विकसित करण्याची कामे मंजूर करण्यात आली आहे. मात्र, 2015-2016 व 2016-2017 या वर्षातील मंजूर असलेल्या अनुक्रमे 12 व 11 कामांपैकी 7 कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नवीन जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार पूर्वी प्रस्तावित केलेली 7 कामे वगळून या कामांऐवजी साईनगर, चैतन्यनगर, गोविंदपुरा, आगरकर मळा, आहेर कॉलनी, बोल्हेगाव सर्वे नं. 17, नंदनवन कॉलनी, रेणुकानगर, समतानगर, रेणाविकर कॉलनी, श्रीनाथ कॉलनी येथे नव्याने कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगर विकास विभागाकडून या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा