प्राथमिक शिक्षक संघाच्या नगर जिल्हाध्यक्षपदी बापू तांबे यांची निवड


अहमदनगर – राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संतोष उर्फ बापू तांबे यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे व सरचिटणीस अप्पासाहेब कुल यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र तांबे यांना पाठविले आहे.
तांबे यांची नियुक्ती अस्थायी स्वरुपाची असून लवकरच संघाचे जिल्हा अधिवेशन घेण्यात येवून त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
बापू तांबे हे गेल्या २० वर्षांपासून शिक्षक संघात कार्यरत असून १० वर्ष त्यांनी संघाच्या कार्यालयीन चिटणीस तसेच सरचिटणीस पदावर काम केलेले आहे. गेल्या ६ वर्षापासून ते गुरुमाउली शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा जिल्हाभरातील शिक्षकांशी मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळेच संघाचे नेते संभाजीराव थोरात, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा