हेमा मालिनी आपल्या नातीसोबत  देवदर्शनाला इस्कॉन मंदिरात 

 

 

अभिनेत्री हेमा मालिनी मुलगी ईशा देओल, जावई भरत तख्तानी आणि नात राध्यासोबत इस्कॉन मंदिरात देवदर्शनाला गेल्या होत्या. हेमा मालिनी अनेकदा इस्कॉनमध्ये देवदर्शनाला जात असतात.

राध्याचा जन्म २३ ऑक्टोबर २०१७ रोजी झाला. राध्याच्या जन्मानंतर तिचा फोटो शेअर करताना ईशाने लिहिले की, ‘राध्या तख्तानी.. आमची मुलगी.’ ईशाने २९ जून २०१२ रोजी व्यावसायिक भरत तख्तानीशी मुंबईतील या इस्कॉन मंदिरातच लग्न केले होते.

नुकतीच राध्या सात महिन्यांची झाली. काही दिवसांपूर्वी ईशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राध्याचा पहिला फोटो शेअर केला होता.जेव्हा हेमा मालिनी सहकुटुंब इस्कॉनमध्ये पोहोचल्या, तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या होत्या. राध्याचा क्युटनेस पाहून तिथे उपस्थित सारेच तिच्या प्रेमात पडले.प्रत्येकांच्या तोंडून राध्याचेच कोडकौतुक केले जात होते.