केंद्र सरकारचा नवा कायदा कामगारांची गळचेपी करणारा-अध्यक्ष योगेश गलांडे

(छाया – लहू दळवी)

अहमदनगर – केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेला शेतकरी व कामगारांसाठीचा कायदा हा गळचेपी करणारा असून त्याचा आम्ही तीव्र विरोध करीत आहोत. नवीन कायदा आणण्यापेक्षा सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, त्यात स्वराज्य कामगार संघटनेने आपला सहभाग नोंदवला. याबाबतचे निवेदन श्री. गलांडे यांना जिल्हाधिकार्‍यांना दिले. सरकारने कंत्राटी काम गारांबाबतचा कायदा रद्द करावा, काम गार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, नगर एमआयडीसी येथे कामगार हॉस्पीटलची उभारणी करावी, कामगारांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी श्री.गलांडे यांनी केली.

यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आकाश दंडवते, काम गार प्रतिनिधी स्वप्नील खराडे, दिपक परभाणे, रमेश शिंदे, सुनिल देवकुळे, सचिन कांडेकर, प्रदीप दहातोंडे, वसीम शेख, आप्पा बोंबळे, सागर बोरुडे, नामदेव झेंडे, आजीनाथ शिरसाठ, भरत दिंडे, राहुल मेहेरखांब, अवि कर्डिले, सचिन खोसे, शरद थोरात, अभिजित सांबारे, अमोल जावळे, नामदेव जगताप, संतोष गायकवाड, शशिकांत संसारे, जितेंद्र तळेकर, रामनाथ घुगे, उमेश जंबुकर, हर्षद बिरंगळ, भास्कर गव्हाणे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा