निरोगी आरोग्याकरिता – योग निसर्गोपचार उत्तम

आज प्रत्येकजण आयुष्यभर सुखाच्या मागे धावत आहे. कुणी ते खाण्या-पिण्या त शोधते तर कोणी हिंडण्या-फिरण्यात तर कोणी ते चालण्या-लिहिण्यात शोधते पण ते सुख उपभोगायचे म्हटले तरी शरीर महत्त्वाचे तेच बिघडले तर कुठली ना कुठली व्याधी मागे लागते मग ती बरी करण्याकरीता धावपळ, हॉस्पिटल, डॉक्टरांकडे फेर्‍या चालू होतात.

मी गेली 42 वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. पण प्रामाणिकपणे विचार केला तर मला हे जाणवते की काही वेळा आपले स्वत:चेच समाधान उपचार करत असताना होत नाही. काही वेळेला पेशंटचे समाधान होत नाही, अशावेळी त्याला स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट कुठेही पाठवा तो तेच व्याधीचे प्रश्‍नचिन्ह घेऊन परततो. पेशंटच्या या अनुभवानंतर मी त्यांना निरनिराळ्या अस्तित्वात असलेल्या पॅथी म्हणजे पर्यायी उपचार पद्धतीमध्ये डोकवायला सुरुवात केली. मग मला हे जाणवले की जी शास्त्रे निसर्गाच्या नियमानुसार किंवा निसर्गाच्या जवळ जावून कार्य करतात त्यामध्ये रुग्णाला उशिरा का होईना व्याधीमुक्तता मिळते. असे म्हटले जाते की ‘Allopathy treats the disese & Nataropathy treats the patient as a whole’ निसर्ग या शब्दाची फोडच मुळी निसर्ग अशी आहे. ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद म्हणूनच शाश्‍वत असा तो निसर्गोपचार आहे.

आज अॅलोपॅथीमधील नवनवीन येणार्‍या अँटीबायोटिक्समुळे मॉडर्न सायन्समध्ये क्रांती केली आहे. एक्स-रे अल्ट्रोसोनोग्राफी, लेझर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटराईज्ड केमिकल रिपोर्टमुळे निदान चिकित्सा सोपी करुन टाकली आहे, हृदयरोपण, किडणीरोपण, बोनमॅरोरोपण या शस्त्रक्रियांमुळे शरीरातील निकृष्ट भाग बदलून नूतन करण्याचे कामही आहे एवढे असून वैयक्तिक किंवा व्यक्तीगत पातळीवर माणुस सुखी-समाधानी दिसत नाही. या पातळीवरच योग-निसर्गोपचारशास्त्र उपयोगी पडणारे आहे. योग निसर्गोपचार जीवनपद्धती आचरणात आणली पाहिजे. ती फार सोपी आहे. ती समजून घेतली की आपले जीवन निरोगी व उत्साही राहिल्याशिवाय राहणार नाही. हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज, ऋषीमुनी रानावनात रहात होते. कंदमुळ खात आणि पायी संचार करत होते. त्यामुळे हजारो वर्षांचे आयुष्यमान घेऊन सुखी, निरोगी आयुष्य जगत होते. त्यांचे जीवनाचे रहस्य हे योग-निसर्गोपचारशास्त्र हेच होते. परंतु दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात ही जीवनपद्धत अडगळीत टाकली गेली. खरेतर योग-निसर्गोपचारशास्त्र हा भूतकाळाचा समृद्ध वारसा आहे. वर्तमानकाळाची ती गरज आहे व भविष्य काळाची उज्ज्वल अशी संस्कृती आहे.

आरोग्याची व्याख्या निरनिराळ्या प्रकारांनी आढळून येईल पण जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या केली आहे की प्रत्येक व्यक्तीने शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक स्तरावर सुस्थितीत असणे म्हणजे आरोग्य अशी त्याची व्याख्या आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी पतंजली मुनींनी हजारो वर्षापुर्वी जे अष्टांगमध्ये सांगितले आहे लिहून ठेवले आहे तेच आज आधुनिक युगात जागतिक स्तरावर वापरले जात आहे. यम-नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी याचा वापर जागतिक स्तरावर होत आहे. आज 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे.

योग निसर्गोपचार ही कार्यपद्धती अहमदनगर येथे गेली 40 वर्षापासून आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था कार्य करत आहे. प्रचारप्रसार करुन विविध शिबीरवर्गाच्या माध्यमाद्वारे योगशिक्षण निर्माण करत आहे.

डॉ. हेमांगिणी पोतनीस

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा