सामाजिक सुरक्षा योजनांना सुरक्षण

घर, शेअर जप्तीची शक्यता : बँका न्यायालयाच्या आदेशानुसार घर, शेअर आणि अन्य गुंतवणूक वसूल करू शकते. कोर्टाच्या अ‍ॅटॅचमेंटमध्ये एक फ्रिजिंग ऑर्डर असते आणि त्यानुसार मालमत्ता जप्त केली जाते. अशावेळी आपण त्या मालमत्तेचा वापर करू शकत नाही आणि विक्रीही करू शकत नाही. अर्थात सरकारने कायद्यानुसार अनेक आर्थिक योजनांना वगळले असून त्यात कोर्टाच्या आदेशानुसार त्या योजनेवर टाच आणता येत नाही. या योजनांचा मिळालेले कायदेशीर सुरक्षा कवच हे गुंतवणुकदारांना फायदेशीर ठरते.

सामाजिक योजना : नागरिकांच्या आणि कर्मचार्‍यांच्या हितासाठी सरकारने काही आर्थिक योजना राबविल्या असून तेथपर्यंत बँकेचे हात पोचू शकत नाहीत. त्यापैकीच एक पीपीएफ योजना. सध्या पीपीएफवर आठ टक्के व्याजदर असून किमान 500 ते कमाल दीड लाखांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर इपीएफमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनातून रक्कम कपात होते आणि कंपनीही तितक्याच प्रमाणात रक्कम इपीएफमध्ये टाकत असते. आपल्या मूळ वेतनाच्या 12 टक्के आणि डीएचे अंशदान इपीएफमध्ये जमा होते. उदा. जर आपले मूळ वेतन 30 हजार असेल तर 12 टक्क्यांप्रमाणे 3600 रुपये मासिक कपात होईल. त्यातील काही रक्कम पेन्शन योजनेत जमा होते. तेवढीच रक्कम कंपनीही पीएफमध्ये जमा करते. याशिवाय 110 वर्षाच्या जुन्या कायद्यानुसार जीवन विमा योजनेतील गुंतवणुकीला सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

इपीएफ : पीएफ आणि पेन्शन योजनेचा पैसा भविष्य कर्मचारी निधी आणि विविध तरतूद 1952 च्या कलम 10 नुसार सुरक्षित मानले जातो. पीएफमध्ये आपले आणि कंपनीचे योगदान असते.

एनपीएस : एनपीएसच्या गुंतवणूकीला पेन्शन फंड रेग्युलटरी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाच्या कलम 6 (अ) नुसार कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. हे निवृत्ती जीवन सुरक्षितपणे व्यतित होण्यासाठी उपयुक्त ठरते. कोर्टाच्या आदेशानुसार बँकाकडून या रक्कमेवर जप्ती आणता येत नाही.

पीपीएफ : भविष्य निर्वाह निधीचा पैसा देखील शासकीय बचत बँक कलम 1873 च्या कलम 14 अ नुसार सुरक्षित आहे. यात 500 ते दीड लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकतो. ही करमुक्त योजना आहे आणि 8 टक्के व्याजदर असल्याने ही योजना लोकप्रिय आहे.

विमा पॉलिसी : आपण जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर त्यास सिव्हील प्रोसिजर कोड 1908 च्या कलम 60 नुसार कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराना मिळालेल्या रक्कमेला देखील सुरक्षा कवच दिले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा