सज्जनगड

 

सज्जनगड

याचे पूर्वीचे नाव परळी. त्याच्या आधीचे नाव अस्वलगड तो शिवाजी महाराजांनी सन १६७३ साली जिंकला. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज येथे दीड महिना विश्रांतीसाठी राहिले होते. समर्थ रामदासस्वामी सन १९७६ ते १६८२  या काळात येथे राहत होते.

समर्थांच्या समाधीच्या जागी पूर्वी खड्डा होता. तेथे समर्थांच्या आज्ञेवरून नंतर समाधी मंदिर बांधले गेले व त्यावर श्रीराम मंदिर बांधले गेले. तंजावरच्या एका अंध मूर्तीकाराने समर्थांच्या सूचनेनुसार बनविलेल्या मूर्तीची स्थापना शेजघरात समर्थांनी स्वत:केली व तेथे समर्थांचे ५ दिवसांनी निधन झाले. नंतर मूर्तीची स्थापना श्रीराम मंदिरात केली.शेजघरात समर्थांची गुप्ती, दंडा, हंडा, शिवाजी महाराजांनी दिलेला मंचक इत्यादी त्यांच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.