विजेच्या धक्क्याने तरुणीच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी; महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर- महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या गलथानपणामुळे पोलिस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, तसेच मयत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केली आहे.

याबाबत शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, संभाजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी; महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन कदम, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, महेंद्र बिज्जा, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, प्रशांत गायकवाड, सुहास पाथरकर, अर्जुन बोरुडे, मंगलताई लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी चर्चा करून दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर शहरामध्ये पाऊस आणि वादळ याला सुरुवात झाली आहे. आज नगर शहरात अशी परिस्थिती आहे की, नगर शहरात अनेक भागात वीजपुरवठा तीन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे नागरीक, विदयार्थी, वृध्द लोकांचे अतोनात हाल होत आहेत. वीज बंद झाल्यावर वीज केव्हा येईल याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत. मोबाईल किंवा फोन उचलत नाहीत व बंद करुन निघून जातात.

महावितरणची आपतकालीन व्यवस्था सुरु केली का नाही याची माहिती व फोन नंबर जनतेला मिळावे आणि आपतकालीन व्यवस्था 15 मिनीटात हजर राहावी. गुरुवारी (दि.13) पोलिस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली होती याला जबाबादार महावितरण आहे. अनेक वेळेस तक्रार करुनसुध्दा ती दुरुस्त न केल्यामुळे त्या मुलीचा मृत्यु झाला आहे. याला जबाबदार कोणते अधिकारी आहेत त्यांना तातडीने निलंबीत करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.