ओंकारेश्वर

हे नर्मदेच्या पलीकडच्या  काठावर  बेटावर आहे,बेट १ किमी लांब व रुंद आहे .हे शंकराचे ,मंदिर नर्मदा नदीच्या काठावरच्या दोन टेकड्यांवर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.एका घाटावरून तेथे शहर व वस्ती आहे. तिकडून दुसऱ्या घाटावर  जेथे मंदिर आहे तेथे जायला नदी  ओलांडून जावे लागते . त्याकरता  एक पादचारी पूल आहे .पण सिंहस्थाच्या वेळी  होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या वेळी तो पुरत नाही. म्हणून नुकताच एक लोखंडी झुलता पूल बांधला आहे .तो लक्ष्मण झुला किंवा कलकत्त्याला हुबळी नदीवर आहेत  त्या पुलांसारखा किंवा अमेरिकेत सन फ्रान्सिस्को येथे golden gate bridge हा suspension ब्रिज आहे तसाच  आहे.तसेच मोटार लॉंचने पण नदी पार करता येते .आता सिंहस्थाच्या वेळी गर्दीचा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा आहे .पण मंदिराला घाटापासून जाण्याच्या  पायऱ्या जुन्या ओबडधोबड आहेत  व रस्ता अरुंद आहे. त्यात सुधारणा करण्याची तातडीने गरज आहे .हे मंदिर बांधण्यात अहिल्याबाईंचा  फार मोठा सहभाग होता .

हे स्थळ इंदूरपासून  ७७ किमी अंतरावर आहे व नर्मदा  आणि कावेरी  संगमाजवळ आहे .मंदिरातील पिंडी व गर्भागृह त्या मानाने लहान आकाराची आहेत .एका बाजूच्या काठावरून  दुसऱ्या बाजूच्या काठाचे मंदिर छान दिसू शकते. नदीला बारा महिने पाणी असते.जवळच नर्मदा व कावेरी संगम आहे  व पूर्व टोकाला सिद्धनाथ मंदिर आहे .त्यात अप्सरांच्यामूर्ती आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा