इंटेरिअर डिझाइन व फॅशन डिझाइन अभ्यासक्रम आय.एस.डी.टी.तील प्रवेश प्रक्रिया झाली सुरू

आतापर्यंत 1500 विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण : विनायक देशमुख

अहमदनगर- ’इन्स्टिट्युट फॉर स्टडीज् इन डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी (आय.एस.डी. टी) या संस्थेचे डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइन व डिप्लोमा इन टेक्स्टाईल अॅण्ड फॅशन डिझाइन या अभ्यासक्रमांची या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रीया सोमवारी (दि.9) पासुन सुरू झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी दिली.

याबाबत माहिती देताना श्री. देशमुख म्हणाले, 2004 साली स्थापन झालेल्या या संस्थेत डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइन व डिप्लोमा इन फॅशन व टेक्स्टाईल डिझाइन हे दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. आय. एस.डी.टी. संस्था एस.एन. डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याशी संलग्न असुन फॅशन व इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील अभ्यासक्रम चालविणारी व विद्यापीठाशी संलग्न असणारी आय.एस.डी.टी. हि जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रशस्त इमारतीत असलेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांना व्यावहारीक प्रशिक्षणही दिले जाते. दरवर्षी ’स्वानुभव’ हे प्रदर्शन व ‘ब्लॉसम’ हा फॅशन शो आयोजित केला जातो. डिझायनिंग बाबत ’रिच कॅड’ या विशेष संगणक प्रणाली व्दारे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी सेमीनार, चर्चासत्रे, तज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेची ओळख असे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे दरवर्षी ’अभ्यास दौरे’ आयोजित केले जातात. शासनाच्या नियमानुसार अनु. जातीजमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध होते. जवळच्या गावांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बसचा पास दिला जातो.

आतापर्यंत संस्थेतुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण केला असुन हे विद्यार्थी रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहेत. अशी माहिती संचालिका सौ.प्राजक्ता धस (कर्डीले) यांनी दिली.

2019-20 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रीया सोमवारी (दि.20) पासुन सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आय.एस.डी. टी, निर्मल चेंबर्स मागे, लाल टाकी, अहमदनगर, (फोन – 0241-2430023) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा