विराजच्या रुपाने एक्सपर्ट अॅकॅडमीचे नाव राज्यात झळकले – पोपटराव पवार 

एक्सपर्ट सायन्स अॅकॅडमीचा विद्यार्थी विराज नजन राज्यात 11 वा

अहमदनगर- विद्यार्थी कितीही सामान्य परिस्थितून आला असला तरी विद्यार्थ्यांच्या इच्छा इच्छाशक्तीवर व मेहनतीवर यशाची उत्तुंग शिखरे पार करू शकतो. आज अनेक अधिकारी हे मराठी माध्यमातूनच शिकले आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या माध्यमातून शिकतो हे महत्त्वाचे नसून कशा पद्धतीने शिक्षण घेऊन त्यात गुणवत्ता मिळवू शकतो, हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित करून त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच यश मिळते. आज विराज नजन याने राज्यात 11 वा येण्याचा मान मिळवून एक्सपर्ट अॅकॅडमीचे नाव राज्यात झळकविले आहे, असे प्रतिपादन आदर्शगांव समितीचे राज्य कार्यध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.

एमएचटीसीईटीमध्ये राज्यात 11 वा आलेला विराज नजन यांचा सत्कार करतांना आदर्शगांव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार. समवेत एक्सपर्ट सायन्स अॅकॅडमीचे संचालक प्रशांत दरे, पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे माजी प्रमुख प्रा.साहेबराव रिंडे, जिल्हा मराठा संस्थेचे सदस्य दिपक दरे, सौ.शिला दरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक प्रशांत दरे म्हणाले, दोन वर्षापूर्वी या अॅकॅडमीची गुलमोहोर रोड येथे शाखा सुरू करण्यात आली.

एमएचटीसीईटीच्या पहिल्याच बॅचचा निकाल चांगला लागला असून, विराज नजन हा राज्यात 11 वा आला आहे, याचा अॅकॅडमीस अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत व चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाले आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांसाठी वेगवेळ्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी सीईटी, जेईई सह इतर परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

विराज नजन यासह संचित चौधरी, इशा चौधरी, निरामय पवार या विद्यार्थ्यांनीही चांगले गुण संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यावेळी प्रा. आर. एस. दिवाने, प्रा. कन्हैय्या चौधरी, प्रा.सौ. टी. एस. धामणे, प्रा.सौ. लांडे आदींसह पालक उपस्थित होते.