नागरिकांनी सायबर क्राईमबाबत दक्षता बाळगून फसवणूक टाळावी

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर – शहरासह जिल्हाभरातून सायबर क्राईमच्या घटना वारंवार घडत असून त्या घटनेत विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसह बेरोजगार तरुणांची संख्या जास्त असे. नागरिकांनी वेळीच दक्ष राहून आपणच आपली फसवणूक होऊ न देता आपल्या मालमत्तेचे रक्षण करावे. खोटे फोन, खोट्या भूलथापा, नोकरीचे अमिष यासह अनोळखी इसमाकडून मदतीची अपेक्षा न बाळगता होणार्‍या सायबर क्राईमबाबत सुरक्षा मिळण्याकरीता दक्षता बाळगावी असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी केले आहे.

खोटे फोन कॉल यामध्ये मी बँक अधिकारी बोलत आहे तुमचे कार्ड ब्लॉक होणार आहे., तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे, तुमचा एटीएम कार्डवरील 16 अंकी क्रमांक, वैधता दिनांक, एटीएम मागे दिलेला सीव्हीसी क्र.सांगा असे फोन करणार्‍यास एटीएम कार्डवरील क्रमांक व वैधता दिनांक आणि कार्डच्या मागे दिलेला सीव्हीसी क्रमांक आणि ओटीपी पासवर्ड सांगितल्यावर आपली फसवणूक होऊ शकते. नागरिकांनी बँक खाते आणि एटीएम संबंधित माहिती कोणालाही देवू नका व आपली फसवणुक टाळावी. कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाचे बँक खाते आणि एटीएम संबंधित माहिती विचारत नाहीत. तुमच्या मोबाईलवर येणारे बँक मेसेज काळजीपुर्वक वाचा. मोबाईल नंबर वर येणारे ओटीपी पासवर्ड जो 6 अंकी असतो तो कोणालाही सांगू नका अन् आपल्या पैशाची आपणच काळजी घ्या.

एटीएमचा वापर करताना घ्यावयाची काळजी

एटीएममध्ये पैसे काढताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश करु देऊ नका, एटीएममधून पैसे काढताना एटीएम कार्डचा पासवर्ड टाकताना कुणालाही न दिसणार याची काळजी घ्यावी, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वत: स्वाईप मशीनवर स्वाईप करावे, एटीएम कार्ड स्कीमर मशिन मधून स्वाईप होणार नाही याची काळजी घ्या, पासवर्ड टाकताना कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यावी, बँक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा, पासवर्ड कुणालाही सांगू नका असे केल्यास आपली फसवणुक होणार नाही.

सोशल नेटवर्किंग साईटवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करु नये, त्यांच्याशी कोणतीही व्यक्तिगत माहिती अथवा फोटोची देवाणघेवाण करु नये, सोशल नेटवर्किंग साईटवर माहिती अगर फोटो शेअर करताना पुर्ण विचार करावा, तसेच दिलेल्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, युवकवर्गासह विधुर, घटस्फोटीत वर्गाची विवाहविषयक संकेतस्थळावरूनही फसवणुक होते. त्याकरीता अशा नागरिकांनी संकेतस्थळावरून अनोळखी हायप्रोफाईल परदेशी व्यक्तीकडून आलेल्या मॅसेजची काळजी घ्यावी, सदरची व्यक्ती स्वत: येत असल्याचे सांगुन किंवा महागडे गिफ्ट पाठवून ते कस्टममध्ये अडकले असल्याचे सांगते व ते सोडविण्याकरीता वारंवार पैशांची मागणी करतात. अशावेळी अनोळखी इसमाच्या बँक खात्यात पैसे जमा करावयास सांगितले जाते, अशावेळी त्यांची पैशाची मागणी पुर्ण केल्यास फसवणुक होते. तसेच या कारणावरुन व्यक्तीगत माहिती घेऊन ब्लॅकमेलिंग करुन फसवणूक केली जाते. अशा घटनांची वाढ दिवसेंदिवस होत आहे.

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असे सांगूनही नागरिकांची फसवणुक केली जाते. त्याचप्रमाणे मोबाईलवर लॉटरी लागल्याचे सांगुन खोटे फोन अगर मॅसेज पाठवुन बँक खात्यात पैसे जमा करावयास सांगितले जाते, तसे पैसे जमा केल्यास निश्‍चितच नागरिकांची फसवणूक होते. तसेच तुमच्या जागेत मोबाईल टॉवर बसवुन देतो त्यातून लाखो रुपये तुम्ही कमवा असे अमिष दाखवून फसवणुक केल्याच्या घटना घडत आहेत. इन्शुरन्स कंपनीचे खोटे अधिकारी म्हणून नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून बँकेत पैसे भरावयास सांगुन फसवणुक केली जाते, चेहरा ओळखा बक्षीस मिळवा व नोकरी देण्याच्या अमिषाने नागरिकांकडून खात्यात पैसे भरुन घेऊन फसवणूक केली जाते.

यामध्ये नागरिकांना कमी व्याजदरात अधिक कर्ज, कागदपत्राशिवाय व कागदपत्रांशिवाय ताबडतोब कर्ज असे अमिष दाखवून कर्जमंजुरीकरीता मोठी रक्कम बँकेत भरुन घेऊन फसवणूक केली जाते. तरी नागरिकांनी अशाप्रकारे घडणार्‍या सायबर क्राईमबाबत वेळीच दक्ष राहुन स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करावे तसेच असे कोणी करीत असल्यास त्याबाबतची माहिती सायबर पोलिसांना द्यावी असे आवाहन पो.नि.औताडे यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा