विश्‍वभारती अभियांत्रिकीमध्ये 17 रोजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती

अहमदनगर- विश्‍वभारती अभियांत्रिकी महाविद्यालय, नगर येथे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्था प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या सत्रामध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करत असते. त्यासाठी महाविद्यालयाने असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री व इतर काही कंपन्यांसोबत करार केलेला आहे. त्यामुळे याही वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस् मुलाखतीचे आयोजन 17 मे रोजी केले आहे.

या मुलाखतीसाठी महाविद्यालयात खालील कंपन्या येणार आहेत – 1. Epitome Components Pvt. Ltd., 2. Auto Cluster Ptv. Ltd., 3. Nikash Engineering Pvt. Ltd., 4. R. S. Engineering Pvt. Ltd., 5. Cabling Harnesses (OPC) Pvt. Ltd. Pune. 6. Angarak Industry Pvt. Ltd

महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मुलांना 17 रोजी सकाळी 9 पासून सुरू होणार्‍या कॅम्पस् मुलाखतीसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.