जामखेड रोडला घरफोडी

भिंगार – बेडरूमच्या खिडकीचे ग्रील उचकटून अज्ञात चोराने आत प्रवेश करून आतील रोख रक्कम, दागिने व घरगुती सामान असा एकूण 20 हजाराची घरफोडी केल्याची घटना जामखेड रोडवरील जामखेड नाक्याजवळील इन्केल्व कॉलनी येथे बुधवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सौ. उषा बापु कोबरणे (वय 37, रा. इन्केल्व कॉलनी, जामखेड नाक्याजवळ, जामखेड रोड, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुटुंबासह घरात झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची ग्रील उचकटून आत प्रवेश केला. आतील लाकडी कपाटाचे लॉक तोडुन 5 हजारांची रोकड, 10 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, घरातील 1 हजार रूपये किंमतीचा कॉम्प्युटरचा एलसीईडी स्क्रीन व 4 हजार रूपये किंमतीचे कॅन्टीनचे घरगुती सामान असा एकुण 20 हजारांची ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी भादंविक 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस नाईक बी.पी. गायकवाड हे करीत आहेत.