बदाम के पान

साहित्य : दीड वाटी बदाम, पाऊण वाटी साखर, एक चमचा दूध, खायचा हिरवा रंग, सात लवंगा, सात विड्याची पानं, तूप, वर्खाचा कागद.

कृती : बदाम दोन तास भिजत घालावे. मग त्याची सालं काढून मिक्सरमधून अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यावे. जाड बुडाच्या कढईत साखर बुडेल एवढंच पाणी घालून पाक करावा. उकळी आल्यावर चमचाभर दूध टाकून मळी काढावी. मग त्यात बदाम वाटण घालून ढवळत राहावं.

मिश्रणानं कड सोडली की उतरवून त्यात दोन-तीन थेंब रंग घालून नीट मिसळून घ्यावा. कोमट असताना त्याचे सात-आठ गोळे करावे.

विड्याच्या पानाच्या उलट बाजूला तूप लावून त्यावर हा गोळा प्लास्टिकवर ठेवून हलके लाटावा. पानाची पट्टी बनवताना घालतो तशा घड्या विड्याच्या पानाच्या सहाय्यानं घालाव्या. लवंगा, वर्ख लावून सजवावं.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा