श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत

नगर – श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूल व मानधना ज्युनियर कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी सर्व नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, बजरंग दरक, प्राचार्या सौ. राधिका जेऊरकर, समन्वयक सावित्री पुजारी, पर्यवेक्षक सौ.अंजना पंडीत उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री.झंवर म्हणाले की, शिस्त, समर्पित भावना व ज्ञानाची भक्ती स्वीकारली तर जीवनात यश प्राप्त होते. शिक्षणाबरोबरच शाळेत मुलांनी खेळ, योगा उपक्रमात सहभाग घेवून स्वत:चा सर्वागीण विकास साधावा. मुलांमधील कौशल्य लक्षात घेवून शिक्षिकांनी योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.

शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक स्वागत फलक लावण्यात आला होता. मुलांना गुलाबपुष्प व खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले. प्राचार्य राधिका जेऊरकर यांनीही मार्गदर्शन केले. टिळक विद्यापीठ आयोजित प्रशिक्षण शिबिरात आदर्श प्रश्नपत्रिका लेखनाचा प्रथम पुरस्कारप्राप्त शिक्षिका सौ.मुग्धा देवकर यांचा व कु.दिया काळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर व पाहुण्यांनी त्यांचे खास अभिनंदन केले. सूत्रसंचालन सुषमा उजागरे यांनी केले तर आभार तबस्सुम शेख यांनी मानले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा